विकाल भोजना वैरमनी
🌻🌹🍃🍀☘🌺☘🍀🌺
विकाल भोजना वेरमनी सिक्खापदं समादियामि |||
मी अवेळी भोजनापासुन अलिप्त राहण्याची प्रतिद्या करतो.
((दुपारी 12 वाजे पासुन दुसऱ्या दिवशी सुर्योदय होईपर्यतच्या वेळेला विकाल वेळ म्हनतात.)) हे अष्टशिलापैकी 6 वे शिल..
शीलाचा अर्थ सदाचार ( सत्याचरण) होतो. शिल बौध्द धम्माचा आधारस्तंभ .त्याच्यावरच बौध्द धम्माची उभारणी झाली आहे. शिल हे माराच्या सैन्याशी झगडत असता त्याच्याकडुन येणाऱ्या शस्त्रांच्या वाराचा प्रतिकार करणारे चिलखत आहे.ते त्याच्या जवळ नाही ,तो त्या मार सैन्याकडुन पराभुत झाला असे समजावे.
काही माणसे जगन्यासाठी खातात की खाण्यासाठी जगतात हे समजत नाही. फक्त खाण्याचा विचार करत असतात .अन्न हे जगन्यासाठी आवश्यक आहे.अन्न मानसाला जगवते तसेच मारते सुध्दा. त्यामुळे असे म्हणतात. अन्नतारी अन्नमारी .अती खाणे म्हसणात जाने. त्यामुळे व्यक्तीने खाण्यावर नियंत्रण ठेवायला हवे. सर्व विकार आजार पोटातुन निर्माण होतात.त्यामुळे पोटाची काळजी घ्यायला हवी. नाहीतर विविध प्रकारचे आजार होतात. मुतखडा मुळव्याथ शुगर रक्तदाब सांधेवात कावीळ ई.. काही पोटभरे पर्यत खातात मग अन्नपचन होण्यासाठी फेऱ्यामारत बसतात. हसावेकी रडावे कळत नाही. जर अगोदरच पोट थोडे रिकामे ठेवले असते तर. . अशी वेळ येत नाही. पोट गच्च भरेलेले असेल तर आळस येतो. झोप येते उत्साह राहत नाही.अभ्सास होत नाही.
👑👑 विकाल भोजना वैरमनी सिक्खापदं समादियामी
सकाळी १२ वाजेच्या अगोदर जे अन्न भेटेल ते खाणे त्यानंतर संध्याकाळी फक्त काही फळे खाणे अल्पोहार करणे किंवा ज्युस पिणे सरबत पिणे.
असे जर आपण केलेतर खुप प्रसन्न वाटते ताजेतवान वाटते..माणसाचे आयुष्यही वाढते.कसल्याच प्रकारचे आजार विकार होत नाही. स्वतःचे मन आपल्याला आपल्या ताब्यात ठेवण्याची सवय लागते. सध्या फास्टफुड चा जमाना आला आहे त्यामुळे मानवाच्या शरीराचा आकार बिघडत आहे वजन जाडी वाढत आहे. काहीच़े वजनही कमी होत आहे..
"" जैसा खावो अन्न तैसा होता है मन "" आपन ज्या प्रकारचे अन्न खातो तसे आपले मन होते. मन चंचल, रागीट, प्रसन्न, शांत ई होण्यासाठी आपण जो आहार घेतो त्याचा खुप मोठा वाटा असतो.
सर्वाना अशी विनंती आहेकी त्यानी जास्तीतजास्त शिलाच्या पालनाची सवय लावुन घ्यावी..
जय भिम,,, जय भारत
जाणिव जागृती अभियान
जागे व्हा.. जागे करा..
शिका संघटित व्हा संघर्ष करा.
विजय शोभा नामदेव त्रिभुवन
मो .नं. 8605895244
Comments
Post a Comment