उच्चासयना महासयना वैरमनी
🌹🌹उच्चासयना महासयना वेरमनी सिक्खापदं समादियामी....
आपली गाडी (माझी सुध्दा) पंचशिलावरच अडकलेली आहे..
हे आठवे अष्टशिल उपासकासांठी व भंतेजी साठी सांगतलेले आहे.. पन हे जगातील सर्व मानवासाठी लागु होते. मला अगोदर या शिलाचे फक्त असेच वाटायचे की खुर्चीवर बसायचे नाही पलंगावर झोपायचे नाही मौल्यवान आसनावर बसायचे नाही. पन भंतेजी सोबत धम्म चर्चा केल्यावर त्यानी व्यवस्थीत समजावुन सांगीतले.. सांगितल्यावर मला गौतम बुध्दाने जो धम्म मार्ग सांगितला तो किती महान आहे ग्रेट आहे याची प्रचती झाली.
उच्चासयना महासयना वेरमनी सिक्खापदं समादियामी
आपल्या समोरील व्यक्ती जर वयाने मोठी व ((Dnya )) न्यानाने हुशार असली किंवा धम्माची आचरण करणारी असेल किंवा भगवान बुध्दाच्या धम्माचे चिवर धारण केलेली भिक्खु असेल तर आपन त्याच्या पेक्षा मोठ्या व उच्च आसनावर बसु नये. किती सरळ व चांगला नियम आहे .
आपन जर चटई वर बसलेलो असलो आणि आपल्या समोरील व्यक्ती जमिनीवर बसेल असेल तर त्याला आपन आपल्या चटई वर बसवावे. जर आपण खुर्चीवर बसलेलो असेल आणि आपल्या समोरील मोठी व्यक्ती खाली बसेल असेल तर आपन त्याना खुर्चीवर बसवावे . खुर्ची साठी किती मर मर चालु आहे याची खुर्ची ओढ त्याची खुर्ची ओढ असे खेळ सध्या चालु आहे. २५०० वर्षानंतर सुध्दा या शिलाचे पालन करणे किती गरजेचे आहे. समाजातील व घरातील बेशिस्तपणा घालवन्यासाठी हे शिल गरजेचे आहे कारण Give Respect take respect हा साधा सोपा निसर्गाचा नियम आहे. तथागतानी सांगितलेला धम्म हा निसर्गाशी निगडीत आहे. त्या मुळे लोकांना पाठीचे विकार होणार नाही .काही लोकांना आठवत नाहीकी ते खाली मांडी घालुन केव्हा बसले होते. काही सोहळ्यात जेवण्यासाठी बफे सिस्टिम मुळे प्रोग्राम चे तीन तेरा वाजतात. सध्याच्या काळात लोकांना खाली बसण्याची लाज वाटत आहे कमी पणाचे वाटत आहे. एखाद्या सभेत भाषन ऐकणाऱ्या पेक्षा देणारे व प्रमुख पाहुने अतिथी जास्त होउन जातात. काही ठिकाणी तर ओझ्यानी स्टेज तुटन्याच्या घटना सुध्दा घडल्या आहे.. वक्ता व क्षोते यांच्यातील अंतर खुप वाढले आहे. जर सर्वानी या शिलाचे पालन केले तर नक्कीच तुम्हा स्वतःला तुमच्या चळवळीला याचा फायदा होईल. संघटनेतील हेवेदावे दुर होतील. तथागतानी सांगितलेले सर्व शिलाचे पालन करावे . कारण मानवता टिकुन ठेवण्यासाठी हे शिल सांगितलेले आहे.
जय भिम जय भारत
नमो बुध्दाय
नमो धम्माय
नमो संघाय
विजय शोभा नामदेव त्रिभुवन
मो .नं . ८६०५८९५२४४
फँम सदस्य
जाणिव जागृती अभियान
Comments
Post a Comment