हँलो मी चळवळ करणार
हॅलो मी चळवळ करणार
हॅलो मी चळवळ करणार
वळवळीलाच क्रांती म्हणणार
सकाळी आठ वाजेपर्यंत झोपणार
नविन ज्ञान नाही मिळवणार
फक्त दिवसभर दुसऱ्याचा व्देष करणार
आणि दुसर्यांनाच उपदेशाचे डोस पाजणार
दुसऱ्यांनाच असे करा तसे करा सांगणार
टिव्हीवरती निरर्थक कार्यक्रम बघणार
चळवळीच्या मिटींगला हजर नाही राहणार
महापुरुषाच्या जयंतीलाच फक्त जागे होणार
हॅलो मी चळवळ करणार
पुस्तक विकत घेणार पण ते नाही वाचणार
फक्त व्हॉट्स अप कॉपी पेस्ट करणार
व फेसबुकवर लाईक शेअर करणार
चळवळीसाठी एक एक रुपया महत्वाचा आहे
पण हजारो रुपये निरर्थक खर्चणार
पंचशील रोज म्हणणार
पण व्यर्थ बडबड खुप करणार
मटण ही आवडीने खाणार
दारुड्यांना विरोध ना करणार
लबाडी करणाऱ्याचे ऐकणार
आणि चहाडीही करणार
मनात सर्वांबद्दल घ्रुणा ठेवणार
हॅलो मी चळवळ करणार
Vijaay Namdeo Tribhuvan
कवि, लेखक-विजय नामदेव त्रिभुवन
सत्ता परिवर्तन म्हणजे काय?
या कविता संग्रहातुन
Comments
Post a Comment