होती आमच्या घरात
*होती एक आमच्या घरात*
घराला जोडणारी सर्वामधील एक दुवा .
त्यामुळे कुणाचे कुणासोबत वादच होत नव्हते.
शिकायची खुप हौस तिला . लहानपणी शाळेत नाव टाकायचा अगोदरच
पाठीवर दप्तर लटकवुन निघाली एकटीच घरातुन शाळेला .
शाळा काही गवसली नाही रस्ता मात्र चुकली .
आई घर कामातच रमली.
कोणा एका देवमानसाने रडणाऱ्या त्यामुलीला कुठे राहते कुणाची मुलगी विचारत विचारत आणले घरी.
आईला शाळेत मधल्या सुट्टीत यायला थोडा ऊशिर झाला . मला वाटले आई आता येणारच नाही .म्हणुन चाललो होतो तिला शाळेतल्या नळावर पाणी पाजायला.
मी बहिणीला ईतक्या मायेने पाणी प्यायला घेवुन चाललो हे बघुन आईला खुप आनंद झाला. आनंदआश्रु आले आईच्या डोळ्याला.
लावली होती ट्युशन आम्हाला.
अँडमिशन घ्यायला गेलो .तेव्हा ट्युशन सुरू होणार होती बहिणीची वह्या पुस्तके काही सोबत नेली नव्हती.
लगेच निघालो मी भर पावसात पुस्तके आणुन द्यायला.
शाळेत कधी काही खाऊ मिळायचा मी आणि भाऊ
तिकडेच खावुन यायचो.
बहिण मात्र घरी घेवुन यायची.
शाळेतल्या आनंदनगरीत आम्ही फक्त खायला जायचो.
ती बिचारी सुगरण काही बनवुन विकायला न्यायची आणि पैसे कमवुन घरी आणायची.
शाळेत मी फक्त बसायला जायचो.
ती गँदरीग मध्ये भाग घ्यायची.
खेळात भाग घ्याची प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायची.
घरी सर्व तिचेच सर्टिफिकेट असायचे.
कधी भुलाबाई बसवायची कधी दांडिया खेळायची.
मैत्रिणीला बोलवुन डब्बा पार्टि करायची.
कवितेला लावायची मस्तच चाल.
दहावीच्या परिक्षेनंतर घरच्या गरिबीमुळे आर्टस घ्यावे लागले.
कॉलेजला पाई पाई रोजच जायची.
कधीच नाही भाड्यासाठी पैसे मागितले.
दिवाळीला ड्रेस पण कधी स्वतःहुन नाही मागीतला .
घेतला तर कमी किमतीचाच घेतला .
वडिलाचे पैसे वाचवण्यासाठी कधी कोणता हट्ट केला नाही.
वडिलाच्या पाठीवर रोज पाय देत.
डिएड ला नंबर लागला कोपरगावला .
आत्याकडुन पैसे घेवुन अँडमिशन घेतले.
ज्या वेळेस स्वतःच्या पायावर उभा रहायची वेळ आली.
त्यावेळी तिला घरासाठी उभा रहावे लागले . इग्लिश शाळेत ३हजार रुपयावर जॉब करावा लागला.
घरीही ट्युशन घ्यावे लागले.
यांचा तिला कधीच त्रास झाला नाही. कारण ती ते ओझं समजत नव्हती तर कर्तव्य समझत होती.
तिचे आता लग्न झाले तरीही माझ्या आईला सर्व शेजारी माधुरीची मम्मी म्हणुनच हाक मारतात.
अशी माझी बहिण
माधुरी नामदेव त्रिभुवन.
Comments
Post a Comment