बाबासाहेब तुम्ही हारलात हो.

बाबासाहेब तुम्ही हरलात हो !

बाबासाहेब तुम्ही हरलात हो!
ज्ञानाचे प्रतीक तुम्ही ,
घटनाकार तुम्ही , 
शिल्पकार तुम्ही ,
पण तुम्ही हरलात हो.
तुम्हाला कोणी विरोधकाने हरवले नाही.
तुम्हाला तुमच्या दुश्मनाने हरवले नाही .
त्यांच्याच काय नीतिमत्ता.
तुमच्या नावावर भोगत आहे सत्ता.
तुम्हाला हरवले तुमच्याच लेकरांनी !
तुम्हाला हरवले तुमच्याच पाखरांनी !
धर्मांतराच्या घोषणेनंतर
सावरकर म्हणाले होते .
तुमची तिसरी पिढी परत हिंदू धर्मात आल्याशिवाय राहणार नाही .
तुमच्या लेकराचा नावासाठी फक्त
बौध्द धम्म.
चालीरिती सर्व हिंदु धर्म.
टिसी, कास्ट सर्टिफिकेट वर बौध्द लिहायला घाबरत आहेत.
आरक्षण भेटणार नाही म्हणुन लिहत नाही .
तुम्ही भारतातील मनुवादी कायदा बदलला .
आम्ही एक सर्टिफिकेट बदलु शकत नाही स्वतःचेच.

स्वयं प्रकाशित बना.
स्वतःच स्वतःचे दिप व्हा.
पण आम्ही दिप पेटवले .
आमच्या मनातील नाही .
दिवाळीतील दिप पेटवले
दारासमोर .
दिवाळीतील कंदिल पेटवले घरावरती.

                 ✍✍✍
         विजय नामदेव त्रिभुवन
         मो.नं.८६०५८९५२४४

Comments

Popular Posts