काय शिवायचे किती शिवायचे

*दुःखाचे कारण तृष्णा*

माणसाच्या दुःखाचे कारण तृष्णा आहे.मानवाच्या ईच्छा ,तृष्णा ह्या सतत वाढत जातात.जो ह्या तृष्णावर विजय मिळवितो तोच व्यक्ती सुखी होवु शकतो.बुध्द होवु शकतो. 
      माझ्याकडे दोन,तीन चांगल्या जीन्स पँन्ट होत्या पँन्टचा काहीच प्रश्न नव्हता.पण शर्ट मोजकेच होते ते ही खराब झालेले .शर्ट घालायचा रोज प्रश्न पडायचा पण माझ्या वाढदिवसाच्या दिवशी भावाने व बायकोने माझ्या साठी शर्ट घेवुन आले. ते बघित्यावर मला खुप आनंद झाला.म्हटले आता टेंशन नाही.आता प्रश्न पडायचा नाही . दुसऱ्यादिवशी शाळेत जाताना मी नविन शर्ट व जीन्स पँट घातली आणि चहा पिण्यासाठी खाली बसायला लागलो तर लगेच माझी गुडघ्याच्या तिथे पँन्ट थोडीशी फाटली आणि मनात विचार आला. माणुस  फाटलेलाच असतो  आणि शेवटी सुध्दा फाटलेलाच राहतो.त्याने कितीही शिवायचा प्रयत्न केला तरी काहीना काही राहुनच जाते. किंवा  दुसरीकडेच फाटतच राहते.जर त्याने फाटलेल्यातच समाधान मानले तर किती चांगले होईल. आयुष्य जगताना काही गोष्टी शिवायच्या बाकीच राहुन जातात.
              ✍✍✍✍
        विजय नामदेव त्रिभुवन
        मो.नं.८६०५८९५२४४
         मुकूंदवाडी औरंगाबाद.

Comments

Popular Posts