मो. पैंगबर यांचे प्राणी प्रेम

प्रेषित मुहम्मद(स) प्रेम,दया करूणासागर .
लेखक::साने गुरूजी भाग .३

मुहम्मद गुरेढोरे चारणे फार आवडे आणि गुरांवर तरी प्रेम किती! 'वेळच्या वेळी पाणी पाजा.शक्तीबाहेर मुक्या प्राण्यापासुन काम घेऊ नका.' अशी त्यांची शिकवण आहे.
      पशुपक्ष्यांविषयी त्यांना प्रेम वाटे .एकाने घरट्यातुन पिले चोरून आणली. ती पक्षीण घिरट्या घालीत येत होती. तो गृहस्थ पिले घेऊन,मुहम्मद यांच्याकडे आला .प्रेषित म्हणाले ,"ती पिल्ले त्या चादरीवर ठेव." त्याने तसे केले .ती पक्षीन प्रेमाने झळकुन तेथे एकदम आली.पैगंबर म्हणाले,"पाहा हे प्रेम.ईश्वराचे याहुनही अधिक प्रेम सर्वावर आहे.जा ही पिले पुन्हा त्या घरट्यात नेऊन ठेव."
     असे हे प्रेमधर्मी मुहम्मद होते.जे अनाथ,परित्यक्त असत त्यांना कोणी नसे,जे दुःखी व रंजले-गांजलेले असत ते त्याच्या जवळ येत,दुःखे सांगत.त्याच्या जवळ बसत,बोलत,चौकशी करीत.बायका आपल्या निर्दय पतींच्या तक्रारी घेऊन येत.अगदी गरीब गुलामही त्यांच्याकडे येत व त्यांचा हात धरून त्यांना आपल्या धन्याकडे नेत व म्हणत, "सांगा ,या आमच्या मालकांना दोन शब्द.आम्हाला नीट वागवायला सांगा,मुक्त करायला सांगा."
     गरीब झोपड्यांतून ते जायचे.सर्वाची विचारपुस करायचे .सर्वाचे अश्रु पुसायचे ,जवळ असेल ते द्यायचे.

 टिप. सर्व धर्मीयानी स्वतःच्या धर्मातील भडकवणाऱ्या लोकांपासुन सावध रहावे.

            ✍✍   संकलन.
            विजय नामदेव त्रिभुवन
          जाणिव जागृती अभियान
            जागे व्हा जागे करा
            मो नं.8605895244

Comments

Popular Posts