नवा प्रयोग साने गुरूजी

*नवा प्रयोग*   साने गुरूजी 
या पुस्तकांतील काही निवडक विचार.

जा घना जा . समाधान बाहर कही नही मिलता ,समाधान मनका एक धर्म है ,मनकी वृत्ती है । विवेकबुध्दीसे समाधान मिलता है ।
* आपण काहीही केले तरी त्यापासुन आपला आत्मा निराळा आहे.ही जाणिव अंतरंगी जागृत ठेवणे याला मी वेदान्त समजतो .कर्माने आत्मा मळत नाही.ते कर्म सत्कर्म असो व दुष्कर्म असो .आत्मा सत् आणि असत् यांच्या पलिकडे आहे.
*घना चोहो बाजुस पाणि असुन मध्ये हा खडक आहे.त्याप्रमाणे जीवनात सर्वत्र निंदा,स्तुती,स्पर्धा मानापमान यांचे वेगवान प्रवाह वाहात असतानाही आपल्याजवळ असा एखादा भक्कम आधार हवा जेथे आपण या सर्व गोष्टीपासुन सुरक्षित असु तेथे आपण परम शांती अनुभवु शकु.
* देशात स्वराज्यासाठी लढे चालले आहेत आणि इकडे सुशिक्षित तरूण या मुलाला आपल्या जवळ जेवायला बसवायला तयार नाहीत.
*या जगात हेतुहीन काहीच नसते.तुमच्या आमच्या मर्यादित बुध्दीला पुष्कळ गोष्टी हेतुशुन्य वाटतात.परंतु मोठ्या यंत्रात लहानशा स्क्रुचेही स्थान असते.त्याचप्रमाणे लहानसहान घटनांनाही विश्वाच्या योजनेत स्थान असते.
* एखाद्याचीही जीवनकळी फुलवायला जर तुझ्या आयुष्याचा उपयोग झाला तर तुझे जीवन कृतार्ज्ञ समज.
*जा घना जा गरिबांच्या सेवेसाठी जा.तुझ्या जीवनातील निराळा अंक सुरु होऊ दे. परंतु तुझ्या मार्गात अडचणी आहेत उपहास आहेत. निराशा घेरील ,अंधार पसरेल .कर्तव्यबुध्दीने जा.फळ मिळो वा न मिळो.
घनाचा आजार.
*विनय हेच तर स्त्रियांचे भुषण .
"हो त्यानेही ता संस्था सोडली .तो तेथेच गावात राहतो.त्याने कामगारांची संघटना आरंभली आहे.
तो त्यांचे रात्री वर्ग घेतो.त्यांना अनेक प्रश्न समजावुन देतो.रविवारी विद्यार्थ्याचे वर्ग घेतो.त्यांना बरोबर घेऊन स्वच्छता करायला जातो.संडासही त्याने स्वच्छ केले.मी घरी येऊन बसलो.घना सेवेत रमला!"
*लोकांची सेवा हेे माझे रामनाम .जपजाप्य माझ्या जवळ नाही.
*संपाची तयारी.*
अज्ञान,अस्वच्छता आळस रूढी नाना भेद हेच आपले शत्रु आहेत.
*जो का घाणीत जगु शकतो,राहु शकतो तो का मनुष्य??
*जय माझ्या नावाचा नको ;माझ्या शिकवणीचा जय असो.
*आम्ही हे काम स्वतःचा अहंकार जावा म्हणुन करीत आहोत.
*टक्केटोणपे खाल्ल्याशिवाय प्रगती होणार नाही .
*मला मुठभर लोकांची क्रांती नको आहो.लाखो लोक जागृत होऊन जेव्हा उभे राहतात.तेव्हा एक निराळीच क्रांती होते.
*भांडवलदाराच्या हातातील सांपत्तिक सत्ता काढुन घेतली तर ते असेच निरूपद्रवी होतील.सापाचे विषारी दात पडल्यावर साप खुशाल खेळत राहिला म्हणुन काय बिघडले.?भांडवलदारांना गोळ्याच घातल्या पाहिजेत असे नाही.परंतु त्यांच्या हातची सत्ता कोण काढुन घेणार.
*मी तुझ्यासाठी काय करू ?तु मला प्रेम दिलेस .मी तुला काय देऊ.? आम्ही विंचुही कृतज्ञ असतो.माणुस एक वेळ कृतज्ञ राहणार नाही.परंतु आम्ही मानवेतर प्राणी उपकार स्मरतो.
*संस्कृती म्हणजे मानवता ,उदारता,सहानुभूती .
*न्यायाचा उपासक अशांतीला भीत नसतो.
*विजयाकडे त्यागाच्या पायऱ्या करूनच जावे लागते.कामगार आज त्याग करतील पुढची पिढी सुखी होईल.
*अन्यायाचा प्रतिकार करण्यात पुरूषार्थ असतो.तुम्ही माणसे बना.साहस करावे ,नविन करुन दाखवावे.
*न्यायासाठी लढणार का ? जय पराजय हा सवाल नाही.परंतु आपण न्यायासाठी धडपडलेच पाहिजे.
*येथे मालकापुढे उद्या नाक घाशीत जाण्याची पाळी आली तर त्यापेक्षा खरोखरच तिकडे भुमातेला हसवायला जावे.
*आपले जीवन व्यापक प्रश्नांशी जोडणे म्हणेजच शिक्षण.
*संधी हातची कशी दवडु ? शतजन्मांचा उपाशी मनुष्य वाढुन आलेले ताट का दुर लोटीत ? असे क्षण पुन्हा येत नसतात.हा क्षण माझ्या जीवनात क्रांती करो.
*इंदुरकडे प्रस्थान*
*मी पकडलो गेलो तर काळजी करू नका.शेवटी आपला धीर हाच आपला मार्गदर्शन.आपली हिम्मत हीच मैत्रीण.
*मी माझ्या सदसद् विवेक बुध्दी प्रमाणे चालतो.ही खरी स्वतंत्रता.जगातील सत्ता फाशी देतील,गोळी घालतील.ते माझे शरिर नष्ट करतील.परंतु माझ्या मनावर सत्ता कोण गाजवणार.? जुल्मी कायद्यांना आपण सांगु शकतो की तुम्ही मला चिरडाल परंतु तुमच्या अन्यायी कायद्यासमोर मी मान वाकवणार नाही .घना ते स्वातंत्र्य अनुभवीत होता.
*बोलणे मला जमत नाही .काही सेवा सांगा ती मी करीन घनाची आज्ञा म्हणुन मी आलो आहे.तुम्ही न्यायासाठी कष्ट ,उपासमार भोगायला तयार आहात हे पाहुन आनंद होतो.
*अन्यायी राजवटीत न्यायी माणसासाठी तुरूंग हीच जागा.
*तुमच्यात मला सेवा करायची आहे.हातांत सोन्याच्या बांगड्या घालुन ती कशी करता येईल.
*जे जे दुसऱ्यावर अवलंबुन ते दुःख ,जे स्वतःवर अवलंबुन ते सुख.

      ✍ संकलन
     विजय नामदेव त्रिभुवन
     मो नं.8605895244

Comments

Popular Posts