शिख धर्माचे संस्थापक गुरू गोंविदसिंग यांचे प्रेरणादायी विचार
*गुरू गोविंदसिंग* ह्या पुस्तकातील काही सुविचार.
* दुष्टदमनार्थ धर्मप्रसारार्थ माझा जन्माचा हाच होता अर्थ.
मी थोर आहे.कारण तुम्ही,
लोकहो तुम्ही मला थोर केले आहे.
*ज्याला दुसऱ्याचे भय वाटत नाही व जो दुसऱ्याला स्वतःचे भय वाटु देत नाही तोच शहाणा माणुस होय.
* वाह गुरूजीका खालसा .खालसा ईश्वराचा आहे.
वाह गुरूजीकी फत्ते.परमेश्वराचा विजय असो.
*आपल्या देशावर संकट आले असता जो मृत्युभयाने पळुन जातो त्याला मृत्यु दुसऱ्या मार्गाने गाठतोच.
*तोच खरा भाग्यशाली होय की जो युध्दांत गुंतला असताही आपल्या हद्यात परमेश्वराचे अधिष्ठान बाळगतो.
*ज्या हातांनी दुसऱ्याची सेवा केली नाही.त्या हातांनी आणलेले मी काहीच घेणार नाही असे म्हणुन गुरूंनी पाणी फेकुन दिले.
*जेव्हा भुकेलेला अन्न मागतो तेव्हा सबबी सांगु नका.जे काही तुमच्या जवळ असेल ते द्या .तुमचे कल्याण होईल.गरिबांचे सुख हीच गुरूंची संपत्ती आहे.
* आमच्या घराण्यात आम्ही पहिला वार कधीच करत नाही.तु माझ्यावर वार केला नाहीस तर मी ही तुझ्यावर वार करणार नाही.
*जो प्रेमाचा मार्ग स्वीकारतो त्याला मृत्युच्या खाईतुनही जावे लागते.
*तुम्ही मला माणसामाणसात भेदभाव न करण्याचे शिकविल्यापासुन मला जखमी झालेल्यात तुमच्या खेरीज दुसरे कोणीच दिसत नाही.
*जेव्हा माणसाचे इतर मार्ग खुंटतात तेव्हा खड्ग धारण करणे सत्कर्मच ठरते.
*तुला जरी ईश्वराचे विस्मरण झाले असले तरी ईश्वराला तुझे विस्मरण होणार नाही.
*जो कोणी प्रामाणिकपणे कर्म करतो त्याला ईश्वर आपल्या सेवेसाठी वाचवितो.
*हे ईश्वरा,माझ्यात असे काहीही नाही की जे माझे आहे.मी जे काही आहे .ते तुझेच आहे.तुझे आहे ते तुला समर्पण केल्यावर माझे असे काय आहे.?
*धर्मपीठावर असता नाते न्याय करणारे होते.रणांगणावर योध्दे होते.आपल्या मसंदांवर राजे होते.खालसाच्या संगतीत ते फकीर होते.
* कारण प्रसंग आला म्हणजे समाज नवे पुढारी निर्माण करतो ही गोष्ट ते जाणीत होते.
संकलन ✍✍✍
विजय नामदेव त्रिभुवन
जाणिव जागृती अभियान
जागे व्हा जागे करा
मो. नं.8605895244
Comments
Post a Comment