निसर्गरम्य क्षण
धामणगाव येथील निसर्गरम्य वातावरणात प्रशिक्षण ठेवले होते . इंटरवेल मध्ये थोडे साईडला गेलो तर हे मनमोहक दृश्य बघायला भेटले . ५ ते १० मिनिटे एक सारखे टक लावुन बघत होतो. निसर्गा कडुन खास माझ्यासाठीच हे दृश्य तयार केले असे वाटले. डोंगराच्या वरती जी झाडे आहेत त्याचे आकार वेगवेगळे प्राणी वस्तु उंट हत्ती गाडी रथ यासारखे दिसत आहे. एखादे बंजारे त्याचा तांडा घेवुन दुसऱ्यागावाला स्थंलातर करत आहे असे दृश्य दिसत आहे.
मागच्या वर्षी उन्हाळ्यात रात्री ११,११.३० च्या दरम्यान घरासमोरील पटांगणात उभा होतो. थोडा उदासच होतो पण सहज काळ्याभोर आकाशात लक्ष गेले तेथे खुप उंचावरुन दोन पांढरेशुभ्र दोन पक्षी उडत होते . ते हंसच असेल. पक्षी ही स्थंलातर करतात या देशातुन त्या देशात चेहऱ्यावर खुप प्रसन्नता आली.
आणि लगेच थोड्या वेळाने पुन्हा तीन पक्षी दिसले .
एकदा भीमाशंकरला फिरायला गेलो होतो . तिथे वरती मुंबई पॉईन्ट आहे तेथुन संपुर्ण कोकण परिसर दिसतो. त्या क्षतिजाकडे बघत असताना खुपच कमी वेळा साठी मनाची अवस्थाही शुन्य झाली होती आपले मन हे भुतकाळ किंवा भविष्यकाळ यांचाच विचार करते.
हे तीन क्षण मी माझ्या आयुष्यात केव्हाच विसरु शकत नाही . व या नैसर्गिक घटना मुळे किती व कसा आनंद भेटला हे ही मी शब्दात सांगु शकत नाही व वर्णन ही करू शकत नाही.
Comments
Post a Comment