मिळविलेले ज्ञान वाया जात नाही
एका राजाचा पुत्र आश्रमात शिक्षण घेत असतो . गुरू त्याला सर्व विदया शिकविता शस्त्र , शासन चालवणे राजपुत्र खूप खुश असतो.गुरुजी एका दिवशी त्याला शिवणकाम शिकवतात.तो नाराज होतो मी राजपुत्र असुन मला शिवणकाम का शिकवतात. तो गुरुवर रागावतो.पण काही बोलता येत नाही .तो ती ही विद्या शिकतो व म्हणतो मी राजा झाल्यावर गुरुजी चा बदला घेईल. तो शिक्षण घेऊन वापस जातो. काही वर्ष राज्य चालवतो.वेषांतर करून तो एका दिवशी दुसर्या राज्यात जातो. तेथील सैनिक त्याला अटक करतात त्यांनी जर ओळख सांगितली तर त्यांनी त्याला मारून टाकले असते. त्याला कैदी म्हणून कैदखान्यात ठेवता.तिथे त्याला शिवण काम करायला लावतात. शिवणकाम करून तयार झालेल्या वस्तू त्याच्या राज्यात जाऊन विकल्या जातात.. गुप्तचर संघटना राज्याचा शोध घेत असतात. शिवण वस्तूवर राजाने एक गुप्त संदेश लिहिलेला असतो.तो त्या सैनिकांना समजतो.तो संदेश वाचून त्यांच्या लक्षात येते की राज्याला कुठे कैद केले आहे. त्याचे सैनिक जाऊन तिथे आक्रमण करतात व राज्याला सोडून आणतात.राजपुत्र वापस आल्यानंतर सरळ त्याच्या गुरु कडे जातो.व गुरुची माफी मागतो.तुम्ही मला शिवनविद्या शिकवत होता .
त्यावेळेस मी नाराज झालो होतो.पण आज त्याच विद्येमुळे माझे प्राण वाचले.प्रत्येक गोष्ट शिकलेली माणसाला आयुष्यात कुठे न कुठे कामात येते.
Moral of the story. कोरोनाच्या सुट्याचा लाभ घ्या स्वतः शिका व स्वतःच्या मुलांनाही शिकवा. समोरच्या व्यक्तीची चांगली उन्नती आपल्याला दिसते पण त्यांनी घेतलेले कष्ट दिसत नाही.
टिप::. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला सांगत आहे.
विजय नामदेव त्रिभुवन
जाणिव जागृती अभियान
जागे व्हा जागे करा
Comments
Post a Comment