सॉक्रेटिस विचार
*सॉक्रेटिस*
लेखक::वासुदेव मायदेव
पुस्तकातील नोट्स
१) बायकोने केलेला अपमान जर मी सहन करु शकलो तर अथेन्स मधील कोणाशीही मला अगदी नीट वागता येईल.
२) त्या क्रोधाला मला गिळून टाकता येऊ लागलं , की ज्ञानाची कितीतरी द्वारं मला खुली होतील.
३) ढोंगी माणसं नेहमी आपल्या सज्जनपणाचा देखावा करीत असतात. खरं वाईट नसलं तरी कडवट असतं आणि कडवट बोलणं शत्रू तेवढे निर्माण करतं.
४) माझे प्रश्न त्याचं अज्ञान त्याच्या ध्यानांत आणून देतील तर सुधारण्याची आशा त्यांच्या देशसेवेच्या कल्पनेचा मी केवळ उपहास केला असं जर त्यांला वाटलं तर मात्र तो माझा कायमचा शत्रू होणार!
५) व्यावहारिक ज्ञान कुठे मिळेल. पण माणसाला खरी गरज आहे ती आत्मोन्नती होईल अशा ज्ञानाची.
६) विद्वते बरोबर माणसांत नम्रताही असावी.
७) खरी विद्वत्ता त्याग व चारित्र्य असे गुण गुरुजीमध्ये असले तर मुलें मान दिल्यावाचून राहत नाही.
८) या जगात आहेवाले आणि नाहींवाले असे दोन प्रकारचे लोक असतात.
९) लोकशाहीचा खून करायचं हे महापातक हा सॉक्रेटिस प्राण गेला तरी करणार नाही.
१०) माहीत नसलेल्या गोष्टीचा शोध घेणे मी माझं जीवितकार्य मानतो.
११) तुमच्या जीवनात तुमच्या शांत स्वभावाने केवढे सुख निर्माण केलं आहे! एवढं दूर्धर संकट कोसळुनही त्या संकटाचा तुम्हाला राग कसा येत नाही.
१२) या नश्वर जगात जे आपल्या तत्त्वांसाठी मरण पत्करतात तेच अमर होतात.
१३) मी माझे प्राण वाचवण्याकरता बोलत नसून तुमच्या हितासाठी बोलतो आहे. ऐकून घ्या
१४) तसं ह्या सुस्त नगराला जागं करण्याचं काम ईश्वराने माझ्याकडे सोपावलं आहे.
१५) डोळ्यात आसवं आणून गयावया करून आपल्या सहानुभूतीची व दयेची भीक मला मागायची नाही.
संकलन
विजय नामदेव त्रिभुवन
जाणीव जागृती अभियान
जागे व्हा जागे करा
मो.नं. 8605895244
Comments
Post a Comment