डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचे विषय

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या भाषणाचे विषय खूपच प्रेरणादायी होते. या पोस्ट मधील तारीख व स्थळ बघून अथक परिश्रम कसे करावे हे समजते.

1) देवालयात गेल्याने तुमचा उद्धार होणार नाही. 28/9/1932 मुंबई
2) जातिभेद नष्ट केल्याशिवाय उन्नतीचा मार्ग असंभव.
16/4/1933 मुंबई
3) गुलाम म्हणून अपमान किती दिवस सहन करणार?
29/9/1934 परळ पोयबावाडी, मुंबई
4) पैशाचा विनियोग गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर करणे हिताचे.30/09/1934 दामोदर हॉल परळ मुंबई
5) माझ्यामागे चळवळ चालविणारे तयार झाले पाहिजेत.
12/10/1935 नाशिक
6) अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो ,पण हिंदू म्हणून मी मरणार नाही. येवला नाशिक
7) धर्मांतराची चळवळ अखिल भारतीय करणार. 10/11/1935 नाशिक
8) जो धर्म माणसांना माणुसकीने वागवत नाही त्याला धर्म कसे म्हणावे? 8/12/1935 मुंबई
9) तुमच्या मताची किमंत मीठ-मिरची सारखी समजु नका.
24/01/1936 सोलापूर स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रचार दौऱ्यावर 
10) माझी चळवळ सर्व अस्पृश्यांच्या  उन्नतीकरिता आहे. 29/02/1936 पनवेल चांभार समाजाच्या सभेतील भाषण
11) देवळाच्या बाहेर माझी अस्पृश्यता जशीच्या तशीच.
  4/05/1936 नेकोलेट पार्क अमरावती
12) आपणाला यावेळी मोठा समुद्र ओलांडून जायचे आहे.
  7/09/1936 पुणे
13) मुक्ती कोण पथे? 31/05/1936 रमाबाई नगर नायगाव मुंबई
14) आपल्या मातीमोल आयुष्याला सोन्याचे दिवस प्राप्त होण्यासाठीच धर्मांतराची आवश्यकता आहे. 17 /05/1936 कल्याण
15) आज साधूत्वाचा केवळ सांगाडा राहिला आहे. 01/06/1936 मुंबई
16) धर्मांतराने अस्पृश्यांना समानतेचा हक्क प्राप्त होणार आहे. 02/06/1936 दादर नायगाव मुंबई.
17) भगिनींनो समाजाला बट्टा लावणाऱ्या धंद्या पासून मुक्त व्हा.
16/06/1936 पोयबावाडी दामोदर हॉल मुंबई
18) धर्मांतराने सर्व अल्पसंख्यांकांचे कल्याण होईल.
 12/01/1936 पुणे
19) सर्वांनी दृढनिश्चयाने आणि संघटितपणे कूच करावयाचे आहे.
19/01/1936 अहमदनगर
20) तुम्हाला गुलामाप्रमाणे राहावयाचे आहे की स्वतंत्र माणसाप्रमाणे जगावयाचे आहे?
   01/03/1936 कुलाबा
21) आपण सात कोटी अस्पृश्य एकाच वेळी धर्मांतर करू.1 में 1936 वर्धा -सेवाग्राम.
22) ज्या धर्मात समता प्रेम व आपुलकी नाही तो धर्म , धर्म नव्हे.4 में1936 अमरावती
23) राष्ट्रीय ऐक्याच्या भावनेसाठी हिंदू-मुस्लीम विभक्तीकरण विनाशक 12 फेब्रुवारी 1938
24) माझा देवाधर्मावर बिलकुल विश्वास नाही 22 में 1938 घोडे जिल्हा पुणे.
25) अस्पृश्यांतील जातीभेद नष्ट व्हावेत हा धर्मांतराचा एक हेतू 
2 जुलै 1939 आर एम भट हायस्कुल हॉल चांभार समाजाची शिक्षक परिषद
26) आपला उध्दार इतर करणार नाहीत त्यासाठी आपणच कंबर कसली पाहिजे.
26 एप्रिल1942 मुंबई
27) आम्ही शासन करता वंश (Ruling Race)होणार. 
31 जानेवारी 1944.
28) बुद्धाच्या वेदांवरील हल्ल्यामुळेच शुद्रांचा सेवाधर्म जावून ते राज्यकर्ते झाले.
29 नोव्हेंबर 1944 पुणे
29)  सिद्धार्थ कॉलेजातील सिद्धार्थता !
15 जाने 1948 सिद्धार्थ कॉलेज मुंबई
                संकलन
           विजय नामदेव त्रिभुवन
          जाणीव जागृती अभियान
              जागे व्हा जागे करा
           मो. नं 8605895244

Comments

Popular Posts