अगाथा ख्रिस्ती
पुस्तक हे मानवाचे खरे मित्र आहे . आज एका मित्रा सोबत भेट झाली सात वर्षा पासुन सोबत होते पण मित्राला भेटण्याची ईच्छा झाली नाही कोरोना मुळे अगाथा ख्रिस्ती अपॉइंटमेंट विथ डेथ या पुस्तकाशी भेट झाली.
स्वतःचा मान स्वतःच राखायचा असतो. हे ज्याला समजतं तो स्वतःचा मार्ग स्वतःच शोधतो आणि आयुष्यात काही करून दाखवतो.
दुसऱ्या माणसांवर सत्ता गाजवण्याची तीव्र आंतरिक इच्छा मनात दडलेली असल्यामुळेच तिनं जेलर होणं पसंत केलेलं असावं.
माणसाच्या सुप्त मनात अशा विलक्षण आणि अनोख्या इच्छाआकांक्षा दडलेल्या असतात,की आपल्याला त्यांची कल्पनाही करता येणार नाही.
सत्तेची हाव - क्रुरतेचा सोस- नासधुस करण्याची राक्षसी इच्छा! आपल्या रानटी पूर्वजांपासून वंश परंपरागत चालत आलेला हा वारसा आहे.
महत्तवाकांक्षा यशस्वी होण्याची इच्छा -सत्तेची हाव या सर्व मनोविकृतीच माणसाच्या आत्माचे अधःपतन घडवुन आणतात.
सर्वोच्च पद मिळविण्याची हाव हा एक प्रकारचा रोग असतो . तो माणसांना पछाडतो . मग ते हुकूमशाही गाजवायला लागतात.
इथे सगळं वाळवटं एखादं सावली देणारं झाड म्हणु़न नाही. वर आकाश आणि खाली वाळवंट ,बाकी काहीच नाही.पण हे काहीच नसणंसुध्दा किती आनंददायक वाटतं ना ?
आपलं कौतुक व्हावं अशी प्रबळ पण दयनीय इच्छा .ही इच्छा जर फलद्रुप झाली नाही. ते अत्यंत हवं असलेलं कौतुक जर नाकारलं गेलं तर माणसाला ते सहनत होत नाही.
गुन्हाचा तपास करतांना संशयित गुन्हेगाराला किंवा गुन्हेगारांना बोलतं करणं अत्यंत महत्त्वाचा असतं. जे तुम्हाला हवं असतं ते सत्य त्यांच्या तोंडुन कधी ना कधी बाहेर पडतंच. या प्रकारणातही तुम्ही पुष्कळ खोटं बोललात पण अनवधानानं तुम्ही मला सत्यही सांगितलेलं आहे.
संकलन
विजय नामदेव त्रिभुवन
मो नं.8605895244
Comments
Post a Comment